Dainik Maval News : पवन मावळ विभागातील किल्ले तिकोणा येथे शनिवार (दि. २३ मे) रोजी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे आणि ” सह्याद्री आणि मी परिवार ” यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दुर्ग संवर्धन मोहीम अतिशय उत्साहात पार पडली.
मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा हा ऐतिहासिक गड असुन छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. गडावर अनेक शिवकालीन वास्तू असून काळाच्या ओघात त्यांची दूरवस्था झाली आहे. परंतु श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या शेकडो शिवभक्त दुर्गसेवकांनी सातत्याने गड संवर्धन मोहीम राबवून किल्ल्याचे रुप पालटण्याचे काम सुरू ठेवले आहे.
शनिवारी झालेल्या मोहीमेत तिकोणा गडावरील तळजाई टाकीमधील गेली अनेक वर्षांपासून साचलेला गाळ, माती आणि दगड काढून पाण्याचे टाके स्वच्छ करण्याचे कार्य करण्यात आले. तसेच परिसरातील तटबंदीची ढासळलेली दगड-माती योग्य प्रकारे रचून जतन करण्याचे कामही मावळ्यांनी एकजुटीने पूर्ण केले.
सदर मोहीमेत श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे, सह्याद्री आणि मी परिवार, सह्याद्री भटकंती सामाजिक प्रतिष्टान, स्वराज्याचे शिलेदार आणि अखिल शिवजन्म उत्सव समिती भुगाव यांच्या जळपास शंभरहून अधिक दुर्गप्रेमी दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे
