व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात !

पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी राब भाजायची (रानवा पेटवायची) कामे सुरू केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Pre-monsoon cultivation work in Maval taluka farm farmer rice

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील काही दिवसांपासून मावळ तालुका, पुणे जिल्हा सह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच खासा मान्सून देखील लवकर डेरेदाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे लगबगीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी राब भाजायची (रानवा पेटवायची) कामे सुरू केली आहे. शेतीची साफसफाई करणे, शेणखत पांगवणे, नांगरणी करणे अशी विविध कामे मावळच्या अनेक भागात शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहेत.

मावळ तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी भाताची लागवड करतात. त्यामुळे पेरणीसाठी पारंपारिक पद्धतीने शेताची भाजणी करून पेरणीसाठी शेत तयार करणे, किंवा आता अलीकडे गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करणे अथवा एसआरटी अशा इतर पद्धतीनेही भाताची लागवड केली जात असल्याने शेतकरी त्यानुसार शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतल्याचे दिसत आहे.

काही भागात खरीप हंगामासाठी व आडसाली ऊस पिकाच्या लागणीसाठी जोरदार शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शेतकरी ट्रॅक्टरने आपल्या शेतीची नांगरट करताना दिसत आहेत. सोबतच शेणखत, पोल्ट्री खत व सेंद्रीय खतांची मात्रा जमिनीत देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

Next Post

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात 'पीएमपीएमएल' बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.