Dainik Maval News : बेबडओव्हळ येथील एका खासगी कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगाराम तेजसिंग यादव (वय ४०, सुपरवायझर, रा. साईनगर बेबडओव्हळ ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार लहु गौतम गायकवाड (वय ३५ रा. पिंपळखुटे ता. मावळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बेबडओव्हळ येथील एटीजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टोअरमधून सुमारे ७ हजार रुपये किमतीची बॉश कंपनीची निळ्या रंगाची हॅमर मशीन चोरीला गेल्याचे आढळून आले.
आरोपीने कोणालाही न विचारता स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ही मशीन परस्पर घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर कंपनी प्रशासनाने शिरगाव परंदवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन




