व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात या नामकरणाची आग्रही मागणी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 29, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर, शहर
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन १ मेपासून तो वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी तब्बल ३० मिनिटांनी कमी करणाऱ्या या सुधारित दळणवळण प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ मार्गाला आणि त्यावरील बोगद्याला इतिहासपुरुष ‘शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात या नामकरणाची आग्रही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, प्रवाशांना अनेकदा मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास करताना जुन्या खंडाळा घाटातून जावे लागते. या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या भावनेने आजही शेकडो नागरिक खंडाळा घाटाच्या माथ्यावर असलेल्या शिंग्रोबाच्या मंदिरात नाणे टाकून नतमस्तक होतात आणि दर्शन घेतात. या ऐतिहासिक वारश्याची आणि श्रद्धेची दखल घेत नवीन बोगद्याला व मार्गाला शिंग्रोबा धनगरांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.

या नामांतराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना धनगर समाज आणि विविध संघटनांनी म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत १८५० च्या सुमारास सह्याद्रीच्या अत्यंत कठीण अशा बोरघाट परिसरातून मुंबई ते पुणे मार्ग शोधण्यासाठी कित्येक गोरे तज्ज्ञ आले, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. अशा हताश परिस्थितीत स्थानिक दऱ्याखोऱ्यांची खडान् खडा माहिती असलेल्या शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या अद्भूत स्थानिक ज्ञानाच्या जोरावर इंग्रजांना घाटातून मार्ग कसा काढायचा याचा अचूक ‘राजमार्ग’ दाखवला. पुढील काळात त्यांनी ब्रिटिशांकडे स्वातंत्र्याची मागणी केल्याने स्वाभिमानी शिंग्रोबांची इंग्रजांनी निर्घृण हत्या केली

दुसरीकडे, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हा मिसिंग लिंक प्रकल्प राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ देणारा ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या नव्या मार्गिकेमुळे जलद वाहतूक, कमी मालवाहतूक खर्च आणि मालाची जलद हालचाल होत असल्याने पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे. तसेच कामगार आणि उद्योजकांची ये-जा सुलभ झाल्याने कंपन्यांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या नामकरणाबाबत आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री काय धोरणात्मक निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

Next Post

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.