व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

पाटण गावात (ता. मावळ) सोमवारी (दि. ६ जुलै) पहाटे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जीव गेला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 8, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पाटण गावात (ता. मावळ) सोमवारी (दि. ६ जुलै) पहाटे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जीव गेला. या दुर्दैवी दुर्घटनेनंतर प्रशासन पुन्हा जागे झाले असून मावळ तालुक्यातील धोकादायक गावे, वस्ती यांचा सर्व्हे सुरू केला असून आवश्यक तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे. परंतु आजपर्यंतचा अनुभव पाहता अशा हृदयद्रावक दुर्घटना एकदा की जुन्या झाल्या, किंवा काळ थोडासा पुढे गेला की, प्रशासनाचे या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष होते. त्यामुळे डोंगराच्या कुशीत राहणारे ग्रामस्थ पुन्हा “डोंगर उशाला अन् धोका जीवाला” याप्रमाणे आपलं जीवन जगत राहतात. प्रशासन आणि नेते हेही पुन्हा एखादी दुर्घटना होईपर्यंत झोपी जातात.

पाटण दरड दुर्घटनेनंतर मावळमधील दरड प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यापूर्वीही माळीण, तळीये, इरशाळवाडी या ठिकाणच्या दुर्घटनांनंतर मावळातील डोंगर पायथ्याला व अगदी डोंगर कुशीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्व ऐरणीवर आला होता. प्रशासनानेही तालुक्यातील बोरज, सावळा, तुंग, माऊ, लोहगड, ताजे, मालेवाडी या गावांचा मुख्य दरड प्रवण क्षेत्रामध्ये समावेश केला आहे.

याव्यतिरिक्त नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळात काही गावे, वस्त्या या थेट सह्याद्रीच्या कुशीत आहेत. त्यांनाही दरड कोसळण्याचा धोका आहे. तसेच, अलीकडे प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून (??) अनेक ठिकाणी डोंगर, टेकड्यांच्या पायथ्याला किंवा मध्यात नवनवे बंगलो, प्रकल्प उभे राहताना दिसतात, त्यामुळे दरडप्रवण क्षेत्रात नव्याने काही क्षेत्रांची भर पडत आहे.

एकूणच तालुक्याचा विचार करता, दरड कोसळण्याच्या शक्यतेने प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे, उपाययोजना करणे गरजेचे आहे. अति संवेदनशील गावांचा सर्वे, पाहणी करणे आवश्यक असून केवळ सर्व्हे, पाहणी वर न थांबता तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.

सोमवारी पाटण गावात दरड कोसळली, पण पाटणसह भाजे, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, देवले, पाथरगाव, सांगिसे, नेसावे, पाले, मोरमारवाडी, जांभवली, घोणशेत, साई, कचरेवाडी, वाउंड, टाकवे बु., कुसवली, कांब्रे, गबालेवाडी, कळकराई ही गावे येथील काही वस्त्या याही डोंगरांच्या कुशीत आहेत. तिथेही प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून नागरिकांना खबरदारीच्या सूचना द्यायला हव्यात, आवश्यक असल्यास ग्रामस्थांचे स्थलांतरण करणे, पुढे जावून गावांचे पुनर्वसन करणे आदी पाऊले उचलली पाहिजेत. नागरिकांनीही खबरदारी बाळगली पाहिजे.

आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जी काही धोकादायक गावे, वस्त्या आहेत, त्या ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्याअनुंषगाने सर्व आप्तकालीन यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य केले पाहिजे. – सुनील शेळके, आमदार मावळ

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

Next Post

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla sunil shelke in maharashtra winter session

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.