Dainik Maval News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात आले.
मावळ तालुक्यात एकूण ४५ लॅपटॉप देण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचे ऑनलाइन कामकाज, अहवाल तयार करणे आणि माहिती भरण्यासाठी या लॅपटॉपचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे काम अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असे सहायक कृषी अधिकारी संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष घनश्याम दरेकर यांनी सांगितले.
कृषी यांत्रिकीकरण, महाकृषी ॲपवरील अहवाल, विकसित भारत योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेतीशाळा, पीक प्रकल्प अहवाल, पेरणी अहवाल, प्रधानमंत्री सुधारित पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य योजनांचे ऑनलाइन कामकाज करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता होती.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या क्षेत्रीयस्तरावरील सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांना शासनाकडून लॅपटॉप देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये उत्साह आणि आनंद पहायला मिळाला. सहाय्यक कृषि अधिकारी संघटना गेली 14 वर्ष लॅपटॉप मिळावा म्हणून पाठपुरावा, आंदोलन करत होते, त्याला अखेर यश आले.
मावळ तालुक्यात तालुका कृषि अधिकारी मारुती साळे यांच्या हस्ते सहाय्यक कृषि अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात आले. मावळ तालुक्यात एकूण 45 लॅपटॉप देण्यात आले. सर्व कृषि अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व कृषिमंत्री यांचे आभार मानले आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


