व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

टाटा कंपनी मात्र कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई देण्यास तयार नसल्याने मंगळवारी (दि.२८) लोणावळ्यातील नागरिकांचा टाटा कंपनीच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरामध्ये ६ जुलै रोजी झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनीचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप लोणावळा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला. टाटा कंपनीच्या मान्सून लेकमधून लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे दोन हजार कुटुंब बाधित झाली आहेत. या कुटुंबाच्या नुकसानीला टाटा कंपनीच जबाबदार असून, त्यांनी नागरिकांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी नगरपरिषदेच्या वतीने केली आहे.

टाटा कंपनी मात्र कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई देण्यास तयार नसल्याने मंगळवारी (दि.२८) लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, आरोग्य समितीच्या सभापती धनंजय काळोखे, पाणी समितीचे सभापती जीवन गायकवाड, नगरसेवक निखिल कवीश्वर व सर्वच नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली लोणावळ्यातील नागरिकांचा टाटा कंपनीच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

लोणावळा शहरात जोरदार पाऊस सुरू असताना या पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टाटा कंपनी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत त्या ठिकाणी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोणावळा शहरामध्ये झालेल्या पूर परिस्थितीला टाटा कंपनी जबाबदार आहे. टाटा कंपनीने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली.

आंदोलनामध्ये लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पूरग्रस्त भागातील नागरिक सहभागी झाले होते. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्यांनी टाटा कंपनीच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर टाटा हायड्रा कंपनीचे मुख्य अधिकारी अजय कोण्णूर व इतर अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार टाटा कंपनी करत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये तालुक्याचे आमदार व जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

लोणावळा नगरपरिषदेच्या प्रमुख मागण्या
1. पूरग्रस्त कुटुंबाला टाटा कंपनीने एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.
2. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा टाटा कंपनीने आरसीसी भिंत बांधून द्यावी.
3. टाटा कंपनीने सीएसआर फंडातून लोणावळा नगरपरिषदेला दरवर्षी एक कोटी रुपये द्यावेत.
4. एनडीआरएफच्या धर्तीवर टाटा कंपनीने एक रेस्क्यू पथक तयार करावे, ज्यामध्ये पाच बोटी व किमान १५ ते २० प्रशिक्षित कर्मचारी असावेत.
5. टाटा कंपनीच्या अधिकृत विमा कंपनीकडून लोणावळ्यातील नागरिकांना विमा संरक्षण मिळावे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


dainik maval jahirat

Previous Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.