व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण, घरकुलांसह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर आढावा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 25, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमवेत सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण व घरकुल विभागातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या कामांना सुधारित प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली. तसेच पाणीपुरवठा योजनांच्या उर्वरित निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामांना प्रत्यक्ष गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मावळातील मराठी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाळांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही चर्चा झाली.

  • सामान्य कुटुंबातील नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. घरकुलांसाठी आवश्यक गायरान जागा उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात मावळ तालुक्यातील १७ आरोग्य उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे निर्मितीबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

बांधकाम विभागांतर्गत मंजूर असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना मावळातील ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. गावागावातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत प्रलंबित कामांना गती देण्यासंदर्भातही चर्चा झाली. स्थानिक नागरिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार कॅम्प आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कृषी विभागाच्या आढाव्यात तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित योजनांचे लक्षांक वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.

  • पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करतानाच जोवण, चावसर, आढले, बेबडओहोळ आणि गहुंजे येथे अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नवीन इमारती उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

याशिवाय मावळ तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे, शाळा, स्मशानभूमी यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची तसेच तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देण्याची मागणी करण्यात आली.

मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विभागांतील कामांचा एकत्रित आढावा घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

  • मावळ तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देऊन संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी दिले. त्यामुळे मावळातील विविध विकासकामांना आगामी काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, बांधकाम सभापती सौ. दीपालीताई हुलावळे, पंचायत समिती सभापती सौ. सुनीताताई येवले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

Next Post

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.