Dainik Maval News : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार, विधीज्ञ, समाजभूषण दिवंगत मदनजी बाफना यांचे सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) आयोजन करण्यात आले आहे. शोकसभा गुरुवारी, दि २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता, वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स कार्यालयात पार पडणार आहे.
सकाळी ९:३० ते १०:३० वाणीभूषण ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांची प्रवचन सेवा होईल. सकाळी १०:३० ते १२ वाजेपर्यंत श्रद्धांजली सभा होणार असून त्यानंतर अन्नप्रसाद होणार आहे.
कै. मदनजी बाफना यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळात मावळच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात मावळ तालुक्याचा विकास साधला गेला आणि त्यांनी संपूर्ण तालुक्याच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचले. मावळकर नागरिकांनी या शोकसभेला उपस्थित राहून आदरणीय बाफना साहेबांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करावी,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
