व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश

सलग चार दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर अखेरीस पाचव्या दिवशी (दिनांक 9 एप्रिल) त्याचे शव पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 10, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
tata-dam-maval-accident

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यातील कान्हे फाट्यापासून आतमधील बाजूस वडेश्वर मंदिराजवळ असलेल्या प्रफुल त्रिभुवन यांच्या फार्म हाऊसमध्ये शेफ म्हणून काम करणारा अर्जुन सुभाष माने (वय 25, मूळ राहणार कोल्हापूर) हा तरुण आपल्या मित्रांसह फार्म शेजारी असलेल्या धरणाच्या पात्रामध्ये पोहत होता. तेव्हा दमछाक झाल्याने धरणात बुडाल्याची माहिती (दिनांक 5 एप्रिल) त्याच्या मित्रांनी स्थानिकांना आणि तद्नंतर पोलीस प्रशासनाला दिली होती. सलग चार दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर अखेरीस पाचव्या दिवशी (दिनांक 9 एप्रिल) त्याचे शव पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले आहे. ( bodies of the youth who drowned in tata dam were successfully recovered from the water vadgaon maval police station )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र मंडळ – लोणावळा, मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांसह स्थानिक गावकऱ्यांनी देखील चार दिवस त्याच्या शोधासाठी प्रयत्न केले होते. परंतू, खोल पाणी आणि अवकाळी पाऊस यामुळे अनेकदा शोधकार्यात अडथळे आले. अखेरीस अर्जून माने बुडालेच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवार, दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी त्याचे शव पाण्याच्या वर आलेले दिसले. त्यानंतर यंत्रणांनी तत्काळ त्याचे शव पाण्याबाहेर काढले.

“टाटा डॅम या ठिकाणी या आधी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच हे धरण खूप जुने असल्याने याचा अंदाज येत नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगावी,” असे आवाहन वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.

हेही वाचा – अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात

सतत पाच दिवसापासून शोध घेणारे वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांसमवेत आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था रेस्कू टीमचे राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड, निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, महेश मसने, सागर कुंभार, अजय शेलार, दिगंबर पडवळ, योगेश दळवी, अमित बलकवडे, मयुर दळवी, अमोल सुतार, भास्कर माळी, शुभम काकडे, सचिन वाडेकर, दक्ष काटकर, विनय सावंत, अवि कारले विशाल जव्हेरी, प्रशांत शेडे, गणेश ढोरे, विकी दौंडकर, साहील नायर, साहील लांडगे, कमल परदेशी, सत्यम सावंत, अजय मुर्हे, अजित सावंत यांनी सहभाग घेतला होता.

अधिक वाचा –
– पवन मावळ भागाला अवकाळी पावसाने झोडपले, गारपिटीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनामे त्वरित करण्याची मागणी
– पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर


dainik maval jahirat

Previous Post

अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात

Next Post

खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
youth-drowned-adgaon-bandhara-khed

खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.