व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
appasaheb-dharmadhikari-maharashtra-bhushan

Photo Courtesy : Twitter


महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज रविवार, दिनांक 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान 27 वा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच संपूर्ण जभरातील लाखो-करोडो श्रीसदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळ्याची तयारी मागील अनेक दिवसांपासून खारघर येथे सुरु होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला होता. त्यामुळेच रविवारी न भूतो न भविष्यती असा हा सोहळा पार पडला. ( padma shri dr dattatreya appasaheb dharmadhikari awarded maharashtra bhushan 2022 by union home minister amit shah kharghar navi mumbai )

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. pic.twitter.com/5sGQAEcj4E

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 16, 2023

महाराष्ट्र भूषण स्व. डॉ नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र असलेले दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. त्यांच्या पत्नी स्व. अनिता धर्माधिकारी यांची त्यांना यात मोलाची साथ लाभली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ सचिन दादा धर्माधिकारी हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा आणि अध्यात्मविद्येचा वारसा चालवत आहेत. स्व. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी मिळालेले पुरस्कार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वीच देशाचा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2014 मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यासह युरोपियन विद्यापीठाच्या वतीने ‘द लिव्हिंग लेजंड’ पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे
– “निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”


Previous Post

भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीणच्या लोणावळा मंडलातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

Next Post

‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

'जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता' - सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.