व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या

श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या

श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 4 मे ते दिनांक 16 मे या कालावधीत कान्हे इथे हे शिबिर संपन्न होणार आहे. जिल्हा परिषद शाळा, कान्हे (ता. मावळ) इथे हे शिबिर होणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्री विठ्ठल परिवार मावळ आणि सकाळ दिंडी नियोजन समितीने बाल वारकऱ्यांसाठी ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या शिबिरातील वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवासी व्यवस्था, सकस व सात्विक आहार, वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापकांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील व मावळ तालुक्यातील आचार्य व कीर्तनकार यांचे मार्गदर्शन, पिण्यासाठी फिल्टर पाणी असेल. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियम व अटी आहेत. ज्यात, विद्यार्थ्यांना मोबाईलवर त्या संदर्भातील उपकरणे वापरण्यास मनाई असेल, शिबिरात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्या विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख शक्यतो परिधान करावा, विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन येणे, प्रवेश घेताना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू स्वतः घेऊन येणे असे काही नियम असणार आहेत.

शिबिरातील दैनंदिन कार्यक्रम;

दैनंदिन कार्यक्रमात, पहाटे पाच ते सहा रियाज होईल, त्यानंतर सकाळी सहा ते साडेसहा पर्यंत योगा होईल, त्यानंतर साडेसात ते आठ पर्यंत प्रार्थना, आठ ते साडेआठ नाष्टा, नऊ ते साडेदहा गीता पाठ, दहा ते बारा मृदुंग व गायन पाठ, बारा ते एक विठ्ठल जप, एक ते दोन भोजन, दोन ते चार विश्रांती, चार ते पाच व्याख्यान, पाच ते साडेसहा लाठीकाठी, साडे सहा ते आठ हरिपाठ, आठ ते नऊ भोजन, नऊ ते साडेनऊ संत चरित्र

या शिबिरात अध्यापक म्हणून पंडित किरण परळीकर गुरुजी, हभप हनुमान महाराज शिंदे आणि हभप दीपक महाराज मुंडे हे असणार आहेत. नियोजन समितीतील हभप लक्ष्मण महाराज सातकर, हभप किसन महाराज केदारी, हभप संतोष महाराज मलपोटे, हभप बाळासाहेब महाराज आडकर, हभप संतोष महाराज शेलार, हभप गोपीचंद महाराज कचरे, हभप जनार्दन महाराज ठाकर, हभप बाबाजी महाराज बालगुडे हे देखील यात सहभागी असणार आहेत. तसेच, हभप गणेश महाराज जांभळे ( अध्यक्ष श्री विठ्ठल परिवार मावळ) हभप दिलीप महाराज केंद्रे (अध्यक्ष कीर्तन महोत्सव समिती) हभप नितीन महाराज काकडे (धअध्यक्ष श्री विठ्ठल नाम जप समिती) आणि श्री विठ्ठल परिवार मावळ गाव प्रतिनिधी आणि विभाग प्रमुख हे सर्वजण असणार आहेत. ( Child Warkari Training Camp at Kanhe by Shri Vitthal Parivar Maval and Sakal Dindi Planning Committee )

अधिक वाचा –
– माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड
– ‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी


Previous Post

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Next Post

मावळमधील कोथूर्णे इथे 6 मे रोजी राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maratha-reservation

मावळमधील कोथूर्णे इथे 6 मे रोजी राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.