जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे इथे बुधवारी (दिनांक 17 मे) रोजी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किशोर आवारे यांच्या खुनातील सुत्रधारांना अटक करावी, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथे जाहीर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी “किशोर भाऊ अमर रहे, न्याय मिळालाच पाहिजे, खऱ्या सूत्रधारांना अटक करा, गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, पाच दिवस झाले खऱ्या गुन्हेगारांना अटक का केली जात नाही?” अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. ( Kishor Aware Murder Case Demand death penalty for criminals March at Talegaon Dabhade )
सुलोचना आवारे यांचा गंभीर आरोप….
किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत सदर हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केलाय. एफआयआरमध्ये आमदार सुनिल शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यासह अन्य तीन अनोळखी माणसांचा देखील उल्लेख आहे.
‘गुन्ह्यातील मारेकरी आणि संशयित आरोपी यांना अटक करण्यात यावी. खऱ्या नराधमाला फशीची शिक्षा द्या. मावळ तालुक्यात अनेक आमदार होऊन गेले पण सध्याचे विद्यमान आमदार यांनी त्यांचे मुळ रूप दाखवून दिले,’ असा आरोप किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी मोर्चात बोलताना व्यक्त केला.
बाळा भेगडे यांचे पोलिसांना आवाहन….
“सदर घटनेमुळे मावळ मध्ये सामाजिक काम करणाऱ्यांना काळीमा फासणारी घटना आहे. राजकीय भूमिकेतून याकडे न पाहता सामाजिक दृष्टीने पाहिले जावे. किशोर आवारे यांच्या जाण्यामुळे सामाजिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याचे काम करावे. पोलीस तपासावर आमचा विश्वास आहे. त्यांनी लवकरात लवकर सूत्रधार जेरबंद करावा,” असे मत यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– पवन मावळमधील रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून साडेचार कोटींचा निधी; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
– लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी