व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

'हे नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे. त्यासोबतच सर्वांना आरोग्य, सौख्य, यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी'

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 2, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
About the success of Mahayuti Dr. Neelam Gorhe took darshan of Ekvira Devi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. बुधवारी, १ जानेवारी २०२५ नवीन वर्षाची नव्याने सुरूवात करत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले.

‘हे नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे. त्यासोबतच सर्वांना आरोग्य, सौख्य, यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी’, अशी प्रार्थना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकवीरा देवीच्या चरणी केली. त्यानंतर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नेत्रदीपक यश महायुतीला मिळाले त्याबद्दल एकविरा मातेचे त्यांनी नवस फेडले आणि श्रीफळ व प्रसाद देऊन त्या नवसाची पूर्तता केली. तसेच डोंगरावरील देवी माता आणि पायथा मंदिर या दोन्ही देवी आईंना साडी-ओटीचा नैवेद्य देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्पण केला.

देवी संस्थान असलेले हे पायथ्याशी असणारे एकविरा मातेचे पायथा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. तिथे आज नवीन वर्षाच्या सुरूवातीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु या सर्व गर्दीमध्ये जनतेने खूप चांगले सहकार्य देऊन अतिशय प्रेमाने डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लोणावळा पोलिसांनी अगदी चोख व्यवस्था केलेली, असं मतही डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी याठिकाणी व्यक्त केले.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, उद्योजक अशोक पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, मंदिर व्यवस्थापक संतोष देवकर, पुजारी तेजस तात्या खिरे आणि सरपंच दत्तात्रय मारुती पडवळ उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : कामशेत ते तळेगाव दरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक ; पुणे-लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द । Pune-Lonavala Local

Next Post

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक, गुणवत्तापूर्ण करावी – मंत्री जयकुमार गोरे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Road works in rural areas should be transparent and of high quality Minister Jayakumar Gore

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक, गुणवत्तापूर्ण करावी - मंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.