Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाटा जवळील दुर्गा परमेश्वरी मंदिराजवळ घडलेल्या अपघातात एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाच गंभीर दुखापत झाली आहे.
बद्री मनोहर कौल (वय ४० वर्षे, रा. मोहितेवाडी) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा पुतण्यासह दोन जण मोटारसायकलवरून आठ जानेवारीला रात्री (एमएच २४ जेएस ६६३७) कामशेत दिशेने प्रवास करीत होते. त्यावेळी रात्री अकराच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहन चालकाने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली.
अपघातात रामकरण मनोज कौल (वय २० वर्षे) याला गंभीर दुखापत झाल्याने तो मृत पावला. तर चंदूमनी संतलाल कौल (वय ३० वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर अपघातास कारणीभूत वाहन चालक घटना स्थळावरुन पसार झाला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News