Dainik Maval News : कार्ला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी वेहरगाव येथील दत्तात्रय मारुती पडवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी विहित मुदतेत दत्तात्रय पडवळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा जरे यांनी काम पाहिले. चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर उपस्थितांनी दत्तात्रय पडवळ यांचे अभिनंदन करीत सत्कार केला.
यावेळी माजी चेअरमन किरण हुलावळे, सुरेश गायकवाड ,जितेंद्र बोत्रे, प्रदीप हुलावळे, सायली बोत्रे, मधुकर पडवळ, प्रशांत हुलावळे, सचिन येवले, राजु देवकर, पांडुरंग भानुसघरे, बाळासाहेब भानुसघरे, अनिल पडवळ, रामचंद्र येवले, दत्तात्रय हुलावळे, किसन आहिरे, सचिन भानुसघरे, रामचंद्र येवले, रंजना गायकवाड, गणपत येवले, पंढरीनाथ हुलावळे, गणेश हुलावळे, बाबाजी मोरे, दिनेश पडवळ, लतीफ शेख, अतुल पडवळ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News