सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदूंबरे या ठिकाणी आयोजित केलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल (CBSE) इंदोरी या शाळेच्या 17 वयोगटाखालील मुले आणि 14 वर्षाखालील मुली यांच्या संघाने चमकदार कामगिरी केली. चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक आला आहे. दिनांक 12 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर 2023 रोजी ही स्पर्धा पार पडली.
सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळले आणि हे यश खेचून आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन भगवान शेवकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक वेद सर, प्रियंका मोरे आणि माधुरी मॅडम यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की ‘खेळ हा विद्यार्थ्याला संघटन, परस्पर साहचर्य, निकोप खिलाडी वृत्ती शिकवतो. खेळ हा खिलाडी वृत्तीने खेळला पाहिजे हा संस्कार चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यावर सातत्याने रुजवला जातो आणि भविष्यातही रुजवला जाईल’ असा सार्थ विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ( Chaitanya International School team placed third in inter school kabaddi tournament )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेश भक्तांना टोल माफी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
– तळेगाव नगरपरिषद आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्टेशन भागात देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड
– भाजे येथील संपर्क बालग्राममधील विद्यार्थिनींना करिअर विषयक मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा उपक्रम