व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

निगडी ते चाकण मेट्रो मार्गाला गती, आराखड्याचे सादरीकरण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 28, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या निगडी भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने गती मिळाली आहे. त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच मान्यता मिळेल. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असून लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

निगडी ते चाकण मेट्रो आराखड्याचे सादरीकरण सोमवारी झाले. या बैठकीतमुकाई चौक किवळे -रावेत- डांगे चौक-काळेवाडी-जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी असा मेट्रो मार्ग तयार करावा. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याची सूचना खासदार बारणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना केली. रावेत, ताथवडे, थेरगाव, जगताप डेअरीपासून चतु:श्रृंगीला जोडण्याचा मेट्रो मार्ग करावा. त्याला गती द्यावी, असे खासदार बारणे म्हणाले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी एक आहेत. जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली. सध्या या भागात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. ज्यामुळे नागरिकांना सुलभ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होत आहे.

निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण मेट्रोने केले आहे. या मार्गामुळे चाकण, भोसरी एमआयडीसी पट्ट्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या आराखड्याला महापालिका सभेची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. पिंपरी-चिंचवडमधील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढत्या वाहतुक कोंडीमुळे आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता मुकाई चौक किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी-जगताप डेअरी व सध्याच्या चतु:श्रृंगी मेट्रो स्टेशनपर्यंत विस्तार करण्याची आवश्यक आहे. हा संपूर्ण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी उद्देशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मेट्रो सेवा आवश्यक आहे. या विस्तारामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन चालना मिळेल. त्यामुळे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंबधी आवश्यक असणारी प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


dainik maval jahirat

Previous Post

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Next Post

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SRT

SRT Rice Technique : 'एसआरटी' म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.