श्री क्षेत्र देहू येथील श्री संत महाराज तुकाराम संस्थान च्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार (दिनांक 26 मार्च) रोजी पार पडली. या निवडणुकीत हभप पुरुषोत्तम महाराज दत्तात्रेय मोरे हे विजयी झालेत. त्यांनी हभप उमेश सुरेश मोरे यांचा 9 मतांनी पराभव केला. संस्थानचे मावळते अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांचा कार्यकाल 31 मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे ही निवडणूक पार पडली. ( Purushottam Maharaj More Elected As President of Shri Sant Tukaram Maharaj Sansthan Of Dehu )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संत तुकाराम महाराज संस्थानच्या गणेशबुवा, गोविंदबुवा आणि आबाजी बुवा अशा तीन शाखा आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. यावर्षी गणेश बुवा शाखेतील दोन उमेदवार होते. त्यापैकी पुरुषोत्तम मोरे हे निवडणुकीत विजयी झालेत. सर्व शाखांतील मिळून एकूण 372 मतदार आहेत.
सदर निवडणूकीत 372 मतदारांपैकी 322 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पैकी हभप पुरुषोत्तम मोरे यांना 164, तर हभप उमेश मोरे यांना 155 मते मिळाली. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या या निवडणूकीत 9 मतांनी पुरुषोत्तम मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे यांनी हा निर्णय जाहीर केला. भास्कर मोरे, शामकंत मोरे, सुजित मोरे हे निवडणूक सहायक अधिकारी म्हणून होते.
अधिक वाचा –
– ‘निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे’, श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ
– सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ संपन्न; महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार
– माझी वसुंधरा अभियान : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तळे परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड