व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंगरुळ येथील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा ; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मावळ तालुक्यातील मंगरूळ हद्दीत अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
report should be submitted on illegal felling mining in Mangrul Village Maval said Anna Bansode

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ हद्दीत अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.

  • मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक ३५ ते ३८ आणि ४१ ते ४९ या वनक्षेत्र आरक्षित भागात झाडांची अवैध वृक्षतोड करून माती, मुरूम व डबराचे उत्खनन झाल्याची तक्रार आली होती. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी मार्च २०२५ च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांसह आमदार सुनील शेळके, मावळ तालुक्याचे उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, वनसंवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असून या प्रकरणाचा अहवाल तत्काळ द्यावा. तसेच मावळ मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी. मावळ तालुक्यात खासगी कंपन्यांतील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य मार्गाने होत असल्याचबाबतची खातरजमा करून त्याचा अहवाल सादर करावा.

पाण्याची सोय न करता सदनिका विक्री बाबत चौकशी करण्याच्या सूचना –
मावळ तालुक्यात अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प उभारले जात असून, अनेक बिल्डरांनी सदनिका बांधून विक्री केली आहे. मात्र, या गृहप्रकल्पांमधील नागरिकांना बोअरिंगच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये दूषित पाण्यामुळे पोटदुखी, त्वचेचे आजार व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबतही चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी

Next Post

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.