व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News

मावळ तालुक्यातील पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी (दि. 10 जानेवारी) मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 11, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
pavana-and-tata-dam-vitims

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी (दि. 10 जानेवारी) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

टाटा कंपनीच्या धरणांमुळे मावळ तालुक्यातील सुमारे तेरा गावे पुनर्वसित झाली. टाटा धरण झाल्यावर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वस्तीला गावठाण दर्जा देऊन त्याचे पुनर्वसित गावठाण घोषित करावे. या पुनर्वसित गावांना अद्यापही गावठाणाचा दर्जा मिळालेला नसल्याने येथे मूलभूत सोयी-सुविधाही पुरविल्या जात नाहीत. टाटा कंपनीने येथील मुलभुत सुविधा व विकासकामांसाठी सीएसआर फंड उपलब्ध करावा. तसेच टाटा धरणग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळावा, अशा विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

  • पवना धरणग्रस्तांसाठी अनेक बैठका झाल्या असून पुढील एक महिन्याच्या आत महसूल व वनविभागने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचे क्षेत्र तात्काळ पुनर्वसन विभागाकडे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
  • टाटा धरणातील प्रकल्पग्रस्तांना लवकरच दाखले वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात येईल तसेच वस्त्यांना गावठाण घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

याबैठकीस आमदार सुनिल शेळके यांच्यासोबत आंदर मावळ टाटा धरणग्रस्त समितीचे कार्याध्यक्ष नारायण ठाकर, उपसभापती मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती नामदेव शेलार, माजी चेअरमन शांताराम लष्करी, धरणग्रस्त समिती पदाधिकारी नारायण बोडके, निकेतन पालकर, माजी सरपंच भरत जोरी, मारुती मराठे, विशाल मराठे, संतोष कडू, राम कालेकर, दत्तात्रय ठाकर, संजय खैरे, रविकांत रसाळ, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते. ( special meeting at Ministry level regarding various demands of project victims of pavana and tata dam )

अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शिंदे सरकारचा निर्णय
– भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा; पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांचे निर्देश । Ajit Pawar
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway


Previous Post

करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

Next Post

सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kamshet-police-maval

सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.