व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात कॅन्सर तपासणी शिबीर, जैन प्रकोष्ठ – महाराष्ट्र प्रदेश आणि वडगाव भाजपाचा कौतुकास्पद उपक्रम

वडगाव शहरातील या कॅन्सर तपासणी शिबिरात एकूण 140 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Cancer-screening-camp

Photo Courtesy : Ananta Kude


वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे ( Cancer screening camp ) उद्घाटन मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते आणि मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वडगांव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

AIJMF चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांच्या माध्यमातून आणि स्वप्नील शहा, गिरीश पारख, डॉ. योगेश पाटणी यांच्या समन्वयातून वडगांव मावळ येथे मा नगरसेवक भूषण मुथा यांच्या विशेष प्रयत्नांतून अत्याधुनिक मोबाईल डिटेक्शन बस मध्ये मॅमोग्राफी, पॅप्समेयर, डिजिटल एक्सरे या सेवेद्वारे गर्भाशयाचा, स्तनाचा, प्रोस्टेट, तोंडाचा आणि ब्रॉंकोयटीस कॅन्सर असे विविध प्रकारच्या कॅन्सरच्या हजारो रुपयांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. ( Cancer screening camp In Vadgaon Maval city )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, बाळासाहेब कुडे, अ‍ॅड. तुकाराम काटे, अखिल भारतीय वारकरी मंडळ वडगांवचे अध्यक्ष नारायणराव ढोरे, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किसनराव भेगडे, गोपाळराव भिलारे, दिपक बवरे, सुरेश भंडारी, मावळ विचार मंचाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, वसंतराव भिलारे, सोमनाथ काळे, दिपक पवार, नंदकिशोर गाडे, बारकू खांदवे, माजी उपसभापती, नगरसेवक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, सरचिटणीस मकरंद बवरे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेवक श्रीधर चव्हाण, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर, महिला मोर्चा अध्यक्षा धनश्रीताई भोंडवे, खंडूशेठ भिलारे, रविंद्र म्हाळसकर, शरद मोरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल ठोंबरे, बाळासाहेब भिलारे, मोरेश्वर पोफळे, प्रमोद म्हाळसकर, शंकरराव भोंडवे, महेश ब. म्हाळसकर, हरिश दानवे, महेंद्र बा. म्हाळसकर, शेखर वहिले, महेंद्र अ. म्हाळसकर, सचिन कराळे, आकाश म्हाळसकर, अरुण सुळके आदी उपस्थित होते.

डॉ. लता राघव, डॉ. मनोज पाटील, लॅब टेक्निशियन जगजीत सिंह, शितल काकरे आदींनी या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या. मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत मावळ तालुका कॅन्सरमुक्त व्हावा असे मत व्यक्त केले. भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी आपल्या मनोगतात नागरिकांनी स्वतःहुन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. वडगांव नगरपंचायतीचे मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी केले. नागरिकांनी या अभिनव आणि अत्यावश्यक उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

अधिक वाचा –

भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन
पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

अपघातवार..! पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर एक किलोमीटर अंतरात 2 अपघात, 2 चालक दगावले

Next Post

कामशेतमध्ये आरपीआय (आठवले गट) नाणे मावळ विभागाकडून जाहीर मेळावा, सुर्यकांत वाघमारे यांचा विशेष सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RPI-Maval

कामशेतमध्ये आरपीआय (आठवले गट) नाणे मावळ विभागाकडून जाहीर मेळावा, सुर्यकांत वाघमारे यांचा विशेष सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.