व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’

'ह्या निर्णयामुळे मावळातील अशा समस्याधारक रहिवाशांना नक्कीच न्याय मिळणार आहे.' - आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 20, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
pmrda-maval-taluka

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


पीएमआरडीए हद्दीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांमधील रहिवाशांना बिल्डर्सकडुन आश्वासन दिल्याप्रमाणे मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. तरी देखील अशा गृहप्रकल्पांना ‘पूर्णत्वाचा दाखला’ कसा काय दिला जातो, अशी लक्षवेधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (दिनांक 16 मार्च 2023) मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथे बैठक संपन्न झाली.

आपल्या मावळ तालुक्यात मोठेमोठे गृहप्रकल्प, टाऊनशिप, सोसायट्या उभारल्या जात आहेत. संबंधित बिल्डर्सकडुन रहिवाशांना रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था इत्यादी सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतू प्रत्यक्षात अनेक ठिकाणी येथील नागरिकांची सुविधांअभावी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत. तसेच या गृहप्रकल्पांमधील सांडपाणी थेट इंद्रायणी व पवना नदीपात्रात सोडले जाते. तरी देखील अशा प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला मिळत असल्याने सदनिकाधारकांना बिल्डर्स जुमानत नाहीत आणि त्यामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पीएमआरडीएसह संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर

पुणे इथे झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांकडून समस्या जाणून घेण्यात येतील व ज्या विकसकांकडून रहिवाशांना मूलभूत सुविधा दिल्या जात नसतील. त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मंजूर करुन घेतलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे पूर्ण काम झाल्यानंतरच सदर गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

‘ह्या निर्णयामुळे मावळातील अशा समस्याधारक रहिवाशांना नक्कीच न्याय मिळणार आहे.’ – आमदार सुनिल शेळके

सदर बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासह पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीए नगररचना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ( There will be direct inspection of housing projects in Maval taluka said mla sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन
– निगडे सोसायटी ठरली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सोसायटी; सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पारितोषिक
– वडगावमध्ये भाजपाकडून ‘अटल आरोग्य’ अभियानाचा शुभारंभ; शहरातील 5 हजार नागरिकांना देणार आरोग्य कीट


Previous Post

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी मिळावी – आमदार शेळके

Next Post

तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
anandacha-shidha

तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

February 20, 2026
Free travel service for 2369 SSC students from 71 villages in maval on initiative of MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७१ गावांतील दहावीच्या २,३६९ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

February 20, 2026
Demand to start CCTV cameras in closed areas of Vadgaon city Statement to administration

Vadgaon Maval : वडगाव शहरातील बंदावस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी ; प्रशासनाला निवेदन

February 18, 2026
Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.