व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Sharad-Gore

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातून प्रसिध्द साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

राजकीय पर्यावसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी, अपेक्षा सबनीस यांनी व्यक्त केली आहे. सबनीस यांच्या मागणीच्या समर्थनार्थ मावळ तालुक्यातून सुमारे 1003 साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मावळ तहसिलदार यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष विठ्ठल दळवी यांनी शिष्ठमंडळाद्वारे महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे ही मागणी केली. ( Appoint Literary Sharad Gore As An MLA On Legislative Council Of Maharashtra Letter To Maval Tehsildar )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. साहित्यिकांसह एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या व्यक्तीला पाठिंबा मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1993 साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे 20 हजार सभासद असून आजवर संस्थेने 150 हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेर देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.

नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगाव मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा यामध्ये समावेश आहे. साहित्यिक शरद गोरे यांनी एकूण 10 ग्रंथाचे आजवर लेखन केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. युगंधर प्रकाशन या संस्थेचे ते संपादक व प्रकाशक आहेत. या संस्थेने आजवर 144 दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यांनी लेखक, दिग्दर्शक व संगीतकार म्हणून 5 चित्रपट व एक नाटक केले आहे. ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या ऐतवी, फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे. उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष विठ्ठल दळवी यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके
– जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड
– भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर


Previous Post

मोठी बातमी! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय

Next Post

सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
competitions-for-ganeshbhakt

सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 26, 2026
Sant Tukaram Sugar Factory Director at your doorstep guidance meet concluded at Dhamane Maval

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

May 26, 2026
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

May 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.