व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha

विजय शिवतारे हे जर बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्म पाळणार नसतील तर आम्हीही मावळ लोकसभा मतदारसंघात उद्रेक करु, असा इशारा आमदारांनी दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ
vijay-shivtare-ajit-pawar-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


विजय शिवतारे हे जर बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्म पाळणार नसतील तर आम्हीही मावळ लोकसभा मतदारसंघात उद्रेक करु, असा थेट इशारा पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला आहे. अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले. तीन दशकांपासून पवार घराण्याचे बारामतीवरील वर्चस्व संपवण्याचा विडा उचलल्याचे विजय शिवतारे म्हणतात. त्याबाबत बोलताना प्रत्युत्तर म्हणून अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडे यांनी हा इशारा दिला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

अण्णा बनसोडे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विजय शिवतारे जे वक्तव्य करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. महायुती सरकारमध्ये काम करत असताना अशा प्रकारची भूमिका घेणे हे योग्य गोष्ट नाही. जर शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात काम करत असतील, तर त्याचा उद्रेक हा महाराष्ट्रभर होईल, आणि याचे परिणाम मावळ मतदारसंघातही पाहायला मिळतील, असा थेट इशारा आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला. ( Pimpri Vidhan Sabha MLA Anna Bansode criticizes Vijay Shivtare Maval Lok Sabha Constituency )

..तर शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार –
बारामतीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे महायुतीचा धर्म पाळत नसल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. शिवतारे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्हीही पाळणार नाही. पार्थ पवार यांचा मागील वेळी झालेल्या पराभवाचा या घडामोडीशी काहीही संबंध नाही. आता तिन्ही पक्षांची महायुती आहे. तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळावा. शिवतारे हे मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळतील असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News
– शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश
– निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण । Pune News

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-bjp-vs-shivsena

खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या 'या' नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.