व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची निवड

व्हाईस चेअरमनपदी सिताबाई अमृता मोहोळ

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2026
in लोकल, ग्रामीण
Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कोथुर्णे ( ता. मावळ ) येथील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब गोविंद दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर, व्हाईस चेअरमनपदी सिताबाई अमृता मोहोळ यांची निवड करण्यात आली. मंगळवारी ( दि. ५ मे ) रोजी वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली.

संस्थेचे मावळते चेअरमन बाळासाहेब मसुरकर यांनी निश्चित केलेला कालावधी पूर्ण होताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तर व्हाईस चेअरमन दादु कदम यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी विहित मुदतेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे बाळासाहेब दळवी आणि सिताबाई मोहोळ यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक ज्ञानेश्वर निंबळे, वाघु श्रीपती दळवी, बाळासाहेब मसुरकर, लक्ष्मण काळे, गणपत काळे, यशवंत बोडके, दादु कदम, बाजीराव शिंदे, सखुबाई गोणते, सचिव रामदास पाठारे उपस्थित होते. तर, अ‌ॅड. नामदेव दाभाडे, ज्ञानदेव सोनवणे, हरिभाऊ आडकर, बाळासाहेब धामणकर, सुनिल निंबळे, संदीप दळवी, संजय दळवी, रामजी काळे, सचिन थोरात, रामभाऊ नढे, बाळासाहेब आडकर, पांडुरंग गावडे, छबन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेतले.

ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार
नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा निवडीनंतर पवनानगर आणि कोथुर्णे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, माजी सभापती संभाजी शिंदे, महादुबुवा कालेकर, नामदेवराव ठुले आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविणार – दळवी
गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले बाळासाहेब दळवी यांनी यापूर्वी पवना कृषक संस्थेचे चेअरमन पद भुषविले आहे. आता कोथुर्णे सोसायटीचे चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर बोलताना, “शेतकऱ्यांना अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देणे, पीक कर्ज मिळवून देणे, शेती अवजारे, बैल -म्हैस गोठा कर्ज प्रकरणे मंजूर करून देणे यांसाठी प्रयत्न करणार, तसेच सर्व संचालकांना सोबत घेऊन शेतकरी हिताचे धोरण राबविणार’ असल्याचे सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत पोलिसांची कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
– संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल
– देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
– राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती


Previous Post

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवनमावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची निवड

May 6, 2026
Police remove accused in BJP worker Ramesh Reddy murder case from scene

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

May 6, 2026
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 6, 2026
Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.