व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

पावसाळा लांबल्यास व उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठ्यात घट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Pavana-Dam

File Photo - Pavana Dam


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावांसह परिसरातील उद्योग धंदे, व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगराकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारे पवना धरण आटू लागले आहे. सद्यस्थितीत (सोमवार, दि. २५ मे) पवना धरणात अवघा २७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागलेली असताना पाण्याचा वापर देखील वाढला आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे, या सर्वांचा परिणाम म्हणजे जलस्त्रोतांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. पवना धरणावर अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सोबत पिंपरी-चिंचवड सारख्या शहरासाठी पवना धरण हे प्रमुख जलस्त्रोत आहे. त्यामुळे पवनेतील पाण्याचे योग्य नियोजन होणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे.

सोमवारी (दि. २५) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात सध्या २७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला धरणातील पाणीसाठा २५.२७ टक्के इतका होता. गतवर्षीपेक्षा यंदा दोन टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असला तरीही यंदा ‘अल निनो’चा असणारा प्रभाव लक्षात घेता हे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.

धरण विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन हे 30 जून पर्यंत पुरेल असे करण्यात आले आहे. मात्र यावर्षी अल निनो प्रभाव असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याच्या सूचना धरण विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्रव्यवहार केला असून १५ % पाणीवापर कपात करण्याचे सांगितले असल्याचे धरण विभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी दिली.

पावसाळा लांबल्यास व उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठ्यात घट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन पवना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

Next Post

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.