व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

या संपूर्ण सोहळ्यात मोठ्या संख्येने स्वामीभक्त सहभागी झाले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 14, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील श्री सद्गुरु सेवा मंडळाच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. या सांगता समारंभाचे आयोजन मुख्य आयोजक गणेश वसंतराव खांडगे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६ वाजता श्री डोळसनाथ मंदिरापासून भव्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर १०८ दाम्पत्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महायज्ञ संपन्न झाला. यानंतर भजन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला गुरुवर्य मोहन बुवा रामदासी, स्वराधीश डॉ. भरत बल्लावली तसेच गुरुवर्य विनीत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायंकाळी साडेचार वाजता खोपोली येथील भजन मंडळाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाच्या पुढील सत्रास प्रारंभ झाला.

नामजप सोहळ्यात नियमित सहभागी होणाऱ्या स्वामीभक्तांचा सत्कार मोहन बुवा रामदासी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. भरत बल्लावली यांनी नामजपाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले, तर मोहन बुवा रामदासी यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून नामस्मरणाचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. गणेश महाराज शिंदे यांनीही आपल्या प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सुभाष शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याविष्कार सादर करण्यात आला. या भावस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

यावेळी गुरुवर्य मोहन बुवा रामदासी यांनी सांगितले की, १ कोटी २५ लाख नामजप संकल्पाच्या निमित्ताने एकूण ४ कोटी ३० लाख नामजप पूर्ण झाला आहे. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

या संपूर्ण सोहळ्यात मोठ्या संख्येने स्वामीभक्त सहभागी झाले होते. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला हा नामजप सोहळा तळेगाव परिसरातील भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरल्याची माहिती श्री सद्गुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष परेश कुलकर्णी यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

Next Post

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.