व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील गेल्या ३ वर्षांत मुदत संपलेल्या ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील गेल्या ३ वर्षांत मुदत संपलेल्या ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामुळे येत्या काही महिन्यांत तालुक्यातील एकूण १०३ पैकी ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाच वेळी उडण्याची शक्यता आहे.

सन २०२४, २०२५ व २०२६ या तीन वर्षांत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची प्रभागरचना व त्यानंतर नुकतीच आरक्षण सोडत प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पार पडली. मावळ तालुक्यात तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्या अधिपत्याखाली या ७३ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी १२ जून रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर संबंधित आरक्षण सोडत प्रारूप प्रसिद्धी १९ जून रोजी होणार असून त्यानंतर २५ जूनपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्यासाठी मुदत आहे. १० जुलै रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदार यादी कार्यक्रम होणार असून पावसाळ्यानंतरच संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून, त्यापैकी तब्बल ७३ ग्रामपंचायतीची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी किमान ५० ग्रामपंचायतीची निवडणूक एकाचवळी होत असे व इतर ग्रामपंचायतीची निवडणूक त्या त्या वेळी होत असे. परंतु एकाच वेळी ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

या ग्रामपंचायतींची होणार निवडणूक
कान्हे, खडकाळा, महागाव, कोथुर्णे, कुरवंडे, कुसगाव खु., गहुंजे, उर्से, बऊर, येलघोल, कुसगाव प.मा., आढले खु, मोरवे, अजिवली, करंजगाव, आँढे खु., वेहेरगाव, ठाकुरसाई, कडधे, धामणे, साते, तिकोणा, दारुंब्रे, शिलाटणे, टाकवे खुर्द, कांब्रे ना. मा., शिवली, पाचाणे, केवरे, काले, गोवित्री, साई, घोणशेत, मळवली, ताजे, खांडशी, नवलाख ऊंब्रे, नाणोली तर्फे चाकण, वराळे, ओझर्डे, पुसाणे, सांगवडे, शिवणे, थुगाव, आढे, येळसे, आंबी, सोमाटणे, माळेगाव बु, तुंग, आपटी, माळवाडी, करूंज, आंबेगाव, जांभूळ, वडेश्वर, डाहुली, मळवंडी ठुले, वारु, परंदवडी, उकसान, पाटण, कशाळ, शिरदे, खांडी, कार्ला, चिखलसे, इंगळून, कुसवली, डोंगरगाव, कुसगाव बु., नाणे, टाकवे बु.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

Next Post

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.