व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी पवन मावळ मंडळाच्या वतीने शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पवन मावळ मंडळाच्या वतीने शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्ष संघटन बळकटीकरण तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने कार्यकर्ते, पदाधिकारी, BLA-2 व बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणेश भेगडे (माजी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप), मा. सभापती गुलाबराव म्हाळस्कर (SIR BLA- 1 प्रमुख), प्रशांत ढोरे (माजी जिल्हा परिषद सदस्य), सायली बोत्रे (महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष), गणेश धणीवले (माजी जिल्हा परिषद सदस्य), रामदास गाडे (पवन मावळ मंडळ प्रभारी), दत्तात्रय माळी (पवन मावळ मंडळ अध्यक्ष), सुमित्रा जाधव (माजी जिल्हा परिषद सदस्या), कल्याणी ठाकर (माजी उपसभापती, पंचायत समिती मावळ), प्रकाश नागरगोजे (प्रदेश कार्यालय नियुक्त SIR तालुका समन्वयक) तसेच अनिकेत म्हाळस्कर (भाजप प्रचारक) उपस्थित होते.

याशिवाय पवन मावळ मंडळातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, BLA-2 आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन दत्तात्रय माळी यांनी केले. आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी गणेश भेगडे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची भूमिका आणि SIR अभियानाचे महत्त्व विषद केले. त्यांनी प्रत्येक बूथवर प्रभावी नियोजन करून पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला. SIR प्रमुख गुलाबराव म्हाळस्कर यांनी विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची सविस्तर माहिती देत नियोजित कार्यक्रम व तारखांबाबत मार्गदर्शन केले.

प्रदेश कार्यालय नियुक्त SIR तालुका समन्वयक प्रकाश नागरगोजे यांनी SIR संदर्भातील विविध बाबींचे सखोल विवेचन केले. तसेच मतदार मॅपिंग प्रक्रिया कशी केली जाते याचे पक्षाच्या अधिकृत अॅपद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले. अनिकेत म्हाळस्कर यांनी आसाम व पश्चिम बंगालमधील SIR अभियानाचे अनुभव सांगत कार्यकर्त्यांना प्रभावी कामकाजासाठी मार्गदर्शन केले.

पक्षीय रणनीती, संघटन मजबुतीकरण, बूथ सक्षमीकरण आणि SIR अभियानाचे महत्त्व याविषयी सखोल चर्चा होऊन बैठक यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाऊसाहेब कराळे यांनी केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

Next Post

वडगावच्या केशवनगरमधील ‘गोखले ले आऊट’ भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Asphalting of four connecting roads in ​​Keshavnagar area Vadgaon Maval has been completed

वडगावच्या केशवनगरमधील 'गोखले ले आऊट' भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.