व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

वीजग्राहकांची संमती न घेता मीटर बदलल्याचा आरोप

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2026
in लोकल, शहर
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वीज वितरण कार्यालयाकडून वीजग्राहकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर त्यांच्या घराचे व सोसायटीचे लाईट मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. यामुळे लोणावळा शहरामध्ये स्मार्ट मीटर लावण्याच्या सक्तीवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

Novel NIBR Ads

मागील काही दिवसांपासून वीज वितरण कार्यालयाच्या ठेकेदारांकडून ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर मीटर बदलले जात आहेत. नवीन मीटरचा भार हा अधिक असून, दोन ते तीन पट वीजबिल येत असल्याचे ग्राहक सांगत आहेत.

वीज वितरण कार्यालयाची ही मनमानी सहन केले जाणार नाही. वेळ पडली तर वीज वितरणच्या या भोंगळ व मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये लोणावळा शहर बंदचा इशारादेखील देण्यात आला आहे. वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे व वीस ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही मीटर लावण्याची सक्ती करू नये, अशी मागणी या सर्वपक्षीयांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांगरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या मोर्चा काढण्यात आला. लोणावळा शहरामध्ये एमएसईबीच्या अनेक तक्रारी आहेत. वारंवार लाईट जाण्याच्या समस्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत एमएसईबीने वीजग्राहकांचे परस्पर मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचा तडाका लावला आहे. वीजग्राहकाला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही व त्यांची संमती न घेता मनमानीपणाने हा कार्यक्रम चालू आहे. याविरोधात भाजपाने वीज वितरणचे कार्यालयाचे अधिकारी आरगडे यांची चांगलीच कानउघडणी केली.

अखेर वीज वितरण अधिकारी आरगडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून भाजपाला वीजग्राहकांची संमती घेतल्याशिवाय मीटर बदलणार नाही, असे लेखी दिल्यानंतर भाजपाने हे ठिय्या आंदोलन स्थगित केले.

Novel NIBR Ads

भाजपाचे आंदोलन सुरू असतानाच त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्मार्ट मीटरसक्तीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर भेटत नव्हते. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ एवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळत असल्याने अखेर मनसेने लोणावळा वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी आरगडे व इतर सर्व सहाय्यक कर्मचारी व अधिकारी यांना कार्यालयाबाहेर काढत कार्यालयाला टाळे लावले.

जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत व लोणावळा शहरामध्ये मनमानी पद्धतीने सुरू असलेली स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया बंद होत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे काढले जाणार नाही असे सांगत चावी पोलिसांकडे जमा केली. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी यांनी वरिष्ठांचे चर्चा करून वीजग्राहकांचे संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर लावणार नाही, असे सांगितले.

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनदेखील स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधामध्ये याचवेळी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीज वितरणचे अधिकारी ग्राहकांशी योग्य प्रकारे बोलत नाहीत. मनमानीपणाने कोणालाही पूर्वकल्पना न देता परस्पर घरांचे व सोसायटीचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावत आहेत याचा निषेध म्हणून त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढत उन्हामध्ये उभे केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

Next Post

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री 'धांगडधिंगा' ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.