व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

फुगड्या, पारंपरिक गाणी, उखाणे, नकला आणि विनोदी लग्नसोहळ्यामुळे गावागावातील वातावरण आनंदमय झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळातील गावागावांमध्ये जपली जाणारी ‘लेकी मागण्याची’ पारंपरिक प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. गौरी-गणपती विसर्जनानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या या पारंपरिक कार्यक्रमात लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत तसेच नागपंचमी आणि गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फुगड्या, पारंपरिक गाणी, उखाणे, नकला आणि विनोदी लग्नसोहळ्यामुळे गावागावातील वातावरण आनंदमय झाले.

पवन मावळ परिसरात भात हे प्रमुख पीक असल्याने भात लागवडीनंतर शेतीची कामे तुलनेने कमी होतात. त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील महिला या कार्यक्रमात सहभागी होतात. गावातील मंदिर किंवा पारावर महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी, फुगड्या आणि फेर धरत आनंद साजरा करतात. त्याचबरोबर गावातील राजकीय व्यक्तींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्या-चालण्याच्या विनोदी नकला सादर केल्या जातात.

या कार्यक्रमात उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंजनात्मक स्पर्धाही आयोजित केल्या जातात. त्यामुळे महिलांना रोजच्या संसारातील सुख-दुःख काही काळ बाजूला ठेवून मनमोकळेपणाने सहभागी होता येते.

रात्रभर रंगतो पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम
‘लेकी मागण्याचा’ हा कार्यक्रम नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या पारंपरिक उत्सवाच्या वातावरणाचा एक भाग असून, गौरी-गणपती विसर्जनानंतर त्याची सांगता होते. या काळात रात्री महिलांच्या घरी पारंपरिक गाणी, फुगड्या आणि नकला सादर केल्या जातात. सहभागी महिलांसाठी आयोजकांच्या घरी चहा-नाश्त्याची व्यवस्था केली जाते.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी रात्रभर गाणी आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा गाणी आणि इतर कार्यक्रम रंगतात. त्यानंतर दुपारी सुमारे एक वाजता पारंपरिक विनोदी विवाह सोहळ्याला सुरुवात होते.

मुलीच्या घरी ‘मुलगी मागायला’ जाते वराकडची मंडळी
या विवाह सोहळ्यासाठी एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजविले जाते. त्यानंतर वराकडील मंडळी मुलीच्या घरी ‘मुलगी मागण्यासाठी’ जातात. नेहमीच्या विवाहपद्धतीची हुबेहूब नक्कल न करता हा संपूर्ण सोहळा विनोदी आणि मनोरंजक शैलीत सादर केला जातो.

पसंतीनंतर विवाहाची तयारी सुरू होते. ढोल-ताशांच्या गजरात ‘नवरा-नवरीची’ वरात काढली जाते. या वरातीत महिला मनसोक्त नाचत-गात सहभागी होतात. साधारण तास ते दीड तास चालणाऱ्या या वरातीनंतर पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडतो. उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली जाते.

या पारंपरिक कार्यक्रमाला गावातील पुरुष मंडळींकडूनही आवश्यक ते सहकार्य मिळते. त्यामुळे महिलांच्या सहभागातून पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली ही ग्रामीण लोकपरंपरा आजही पवन मावळातील गावांमध्ये उत्साहाने अनुभवायला मिळत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप


dainik maval jahirat

Previous Post

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

Next Post

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.