Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपाच्या वतीने मंगळवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
यावेळी मावळ तालुका भाजप समन्वयक शांताराम कदम, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे सचिव प्रशांत भागवत, तळेगाव मंडल अध्यक्ष विनायक भेगडे, लोणावळा मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, पवन मावळ मंडल अध्यक्ष दत्ता माळी, आंदर मावळ मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी चे तुषार भेगडे. नितिन धोत्रे यांच्यासह विविध मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान तळेगाव दाभाडे, वडगाव आणि लोणावळा परिसरात भाजपाचे आजी-माजी नगरसेवक असतानाही निवेदन देण्याच्यावेळी एकही नगरसेवक उपस्थित नसल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः तळेगाव दाभाडे शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी या निवेदनावेळी उपस्थित राहणे अपेक्षित होते, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

