व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘…निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये’, आमदार शेळकेंची बाळा भेगडेंवर जहरी टीका, दिला ‘हा’ सल्ला

तालुक्याला 5 कोटी 62 लाख रुपयांचा निधी नाही तर साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत, आमदारांना मंजूर कामांची बेरीजही जमत नसल्याचा टोला लगावला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2023
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke & Bala Bhegade


आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यातील विद्युतविषयक विविध कामांसाठी 5 कोटी 62 लाख 12 हजार एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती समाज माध्यमांवर टाकली होती. त्यावर मावळचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य बाळा भेगडे यांनी तालुक्याला 5 कोटी 62 लाख रुपयांचा निधी नाही तर साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत, आमदारांना मंजूर कामांची बेरीजही जमत नसल्याचा टोला लगावला होता. त्यावर आता आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

….निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये!

माजी आमदार बाळा भेगडे यांच्या टीकेला आणि लगावल्याला टोल्याला विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी जशाच तसा टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे. पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये, अशी जहरी टीका आमदार सुनिल शेळकेंनी माजी आमदारांवर केली आहे. ( fund approved by Pune District Planning Committee to Maval Taluka Electricity work conflict between MLA Sunil Shelke and Bala Bhegade )

“जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विद्युत विभागाच्या अंतर्गत अनेक कामे मंजूर झाली आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सुचवल्यानुसार ही कामे होत असतात. गुरुवारी (6 एप्रिल) वडगाव मावळ येथे झालेल्या आढावा बैठकीत जी कामे मंजूर झाली आहेत. त्यासंबंधीची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत आणि या मंजुर झालेल्या कामांबाबत मी माननीय पालकमंत्र्यांचे जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत. त्यामुळे पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसु नये’, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘विद्युत विभागाच्या कामासाठी साडेसात कोटी, आमदारांना मंजूर विकासकामांची बेरीजही जमेना’ – बाळा भेगडे यांचा टोला

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२ -२३ सामान्य विकास विभाग सुधारणा अंतर्गत आपल्या मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या सुमारे ५ कोटी ६२ लक्ष १२ हजार रु.च्या कामांना मान्यता मिळाली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे मन:पूर्वक आभार! pic.twitter.com/iQtnyYpKph

— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 7, 2023

तसेच, राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार आहे. तुमचे असलेले राजकीय वजन आणि संबंध वापरुन जी दहा कामे तालुक्यातील सुचवली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. किरकोळ कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालू नये, असा सल्लाही आमदार शेळकेंनी बाळा भेगडेंना दिला.

तालुक्याला निधी मंजूर झालेली विकासकामे;

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विद्युत कामासाठी 1 कोटी 39 लाख 48 हजार रुपये, यासह तालुक्यातील सोमाटणे, सांगवडे, साळुंब्रे, धानगव्हाण,उर्से, राजपुरी, कामशेत, कल्हाट, वडगाव (मावळ), ब्राम्हणोली, सांगीसे, आढे, काले, चावसर, थुगाव, कोथुर्णे बऊर, पुसाणे, ठाकुरसाई, शिळिंब, चिखलसे, नाणे, इंदोरी, उकसान, आढले, कशाळ, जांबवडे, भोयरे, जांभुळ, चांदखेड, कडधे, गहुंजे आदी गावांतील विद्युतविषयक विकासकामांसाठी निधी मंजुर झाला, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.

अधिक वाचा –
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा नूतनीकरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
– हनुमान जयंती आणि काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त टाकवे खुर्द गावात पार पडली भव्य छकडी स्पर्धा


dainik maval jahirat

Previous Post

‘विद्युत विभागाच्या कामासाठी साडेसात कोटी, आमदारांना मंजूर विकासकामांची बेरीजही जमेना’ – बाळा भेगडे यांचा टोला

Next Post

कोंडिवडे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा! नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jal-Jeevan--maval

कोंडिवडे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा! नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.