व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

तळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीबाबतचा खुलासा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 5, 2026
in पुणे, ग्रामीण, व्हिडिओ, शहर
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी वर येणे आणि रस्ता खचल्याबाबत काही माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांवर विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत. याबाबत नगर परिषदेकडून वस्तुस्थितीदर्शक खुलासा दिला आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका तसेच वितरण नलिका टाकण्याची कामे करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत संभाजीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या आउटलेट लाईनची नियोजित तांत्रिक चाचणी रविवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी घेण्यात येत होती. या चाचणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी, संबंधित कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सदर मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुमारे दीड वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. संबंधित रस्ता हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व अत्यंत वर्दळीचा असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अंतिम चाचणीपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.

नियोजित चाचणी सुरू करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. टाकीतून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब अधिक असल्याने जमिनीखालून पाणी वर आले. ही बाब निदर्शनास येताच तांत्रिक पथकाने तत्काळ मुख्य व्हॉल्व बंद करून पाण्याचा प्रवाह थांबविला.

त्यानंतर संबंधित ठिकाण तातडीने मोकळे करून पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले असून, उर्वरित काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्ता व परिसर पूर्ववत करण्यात येईल.

त्यामुळे सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची किंवा अनपेक्षित दुर्घटनेची नसून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडलेली बाब आहे. असे तळेगाव नगर परिषदेकडून देण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू
– शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही
– पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

Next Post

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.