व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत मध्य रेल्वेने काही त्रुटी काढल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, लोकल, शहर, शहर
Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत मध्य रेल्वेने काही त्रुटी काढल्या आहेत. हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे आला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने त्रुटी तत्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे केली.

खासदार बारणे यांनी रेल्वे बोर्डाचे निदेशक फखरुद्दीन अली अहमद यांची भेट घेतली. त्यांना याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात. या मार्गावर असणारा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण लक्षात घेता उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र मार्गाची अनेक वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मागणी केली जात होती. त्यानुसार त्यांचा केंद्र, राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्याच प्रयत्नाून या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी २०१७ मध्ये मान्यता मिळाली आहे.

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च पाच हजार १०० कोटी रुपये आहे. त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०.५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य शासन उचलणार आहे. राज्य शासनाचा एकूण वाटा दोन हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

खासदार बारणे म्हणाले, पुणे-लोणावळा तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकला मान्यता मिळाली आहे. मध्य रेल्वेने त्यात काही त्रुटी काढल्या आहेत. प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे आला आहे. रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव निती आयोगाकडे जाईल. त्यानंतर केंद्राकडून मान्यता मिळेल. त्यामुळे रेल्वे बोर्डाने तातडीने त्रुटींची दुरुस्ती करावी. परिपूर्ण प्रस्ताव तातडीने द्यावा. हा प्रस्ताव निधीसाठी निती आयोगाकडे जाईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळेल. त्यानंतर कामाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला चार ते पाच महिन्यांचा कालावधी जाईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निधीची तरतूद करुन ठेवली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन
– केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

Next Post

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
No royalty charged for using soil or murrum from one own farm no police or revenue action will be taken either

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.