व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

सहकार विभागाच्या पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीडीसीसी बँकेला पात्र कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य शासनाची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील संबंधित पोर्टलवर अपलोड केला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश जगताप यांनी दिली.

  • सहकार विभागाच्या पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीडीसीसी बँकेला पात्र कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पात्र थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे.

मात्र योजनेसाठी पात्र असलेल्या ११३ मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद अद्याप पूर्ण झालेली नसल्याने त्यांच्या खात्यांचा तपशील अपलोड करता आलेला नाही. तसेच २९ पात्र सभासदांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांची माहितीही पोर्टलवर नोंदविता आलेली नाही, असेही प्रकाश जगताप यांनी सांगितले.

मृत सभासदांच्या वारसांनी वारस नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच आधार क्रमांक उपलब्ध नसलेल्या सभासदांनी आवश्यक माहिती संबंधित संस्थेकडे जमा करावी, जेणेकरून त्यांचाही तपशील पोर्टलवर अपलोड करून योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

तालुकानिहाय अपलोड झालेले थकीत कर्जदार (तालुका – कर्जदार)
आंबेगाव – ३,३९०
बारामती – १३,७२८
भोर – ७,२४२
दौंड – १९,५६२
हवेली – ४,१६८
इंदापूर – १८,८१८
जुन्नर – ७,७७८
खेड – ७,८५३
मावळ – ५,१७२
मुळशी – २,३८७
पुरंदर – ७,९०३
शिरूर – ८,४५२
वेल्हा – १,८८८
एकूण – १,०८,०४१

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन
– केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

Next Post

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.