व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह घाटात फेकला, लहान मुलाला आळंदीला सोडले ; मावळ तालुक्यातील आरोपी गजाआड

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Murder of a woman in a live-in relationship Dinesh Thombre from Maval taluka arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला. त्यानंतर महिलेच्या तीन वर्षीय मुलाला आळंदी येथे सोडून देत स्वतःच पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर वाकड पोलिसांनी तक्रार देणाऱ्या या प्रियकराला अटक केली आहे. दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. बौर ता. मावळ जि.पुणे ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असून जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारूंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी प्रेयसी जयश्री विनय मोरे जिंजर हॉटेल, भूमकर चौक, वाकड येथून काही न सांगता निघून गेली ती परत आली नसल्याची तक्रार दिनेश ठोंबरे याने वाकड पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांना जयश्री मोरे यांचा मृतदेह खंबाटकी घाट (खंडाळा) जि. सातारा येथे आढळून आला. याबाबत सातारा पोलिसांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दिनेश ठोंबरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

दिनेश आणि जयश्री हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान दिनेश याला जयश्री हिचे दुसऱ्या पुरुषाबरोबर सबंध असल्याचा संशय होता. तसेच तिने दिनेश यास पैशाची मागणी केल्याने दिनेश याने २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जिंजर हॉटेल सर्व्हिस रोड, भुमकर चौक परिसरात तिच्याशी भांडण केले. त्यावेळी त्याने कारमधील हातोडी जयश्री मोरे हिच्या डोक्यात मारुन तिचा खून केला. तिचे प्रेत सातारा हायवेने कारमधून नेऊन खंबाटकी घाट (खंडाळा) जि सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले.

जयश्री मोरे हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. दिनेश याने मुलाला आळंदी येथे सोडून दिले. त्यानंतर स्वतः वाकड पोलीस ठाण्यात जाऊन जयश्री मोरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र त्याचा बनाव अवघ्या १२ तासात उघडकीस आला. पोलिसांनी दिनेशला अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महानवर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade

Next Post

आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Citizens of Maval constituency are coming to Talegaon Dabhade to meet MLA Sunil Shelke

आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.