व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval

मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा ठाकुरसाई गावच्या हद्दीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
drowning

File Photo


मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा ठाकुरसाई गावच्या हद्दीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मनिष शंकर शर्मा (वय 20 रा. मुंबई) असे सदर मयत तरुणाचे नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवारा कॉलेजमधील मेडिकलचे शिक्षण घेत होता. त्याच्यासह एकूण 15 वर्गमित्र पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मित्रांच्या ग्रुपमधील 4 विद्यार्थी पवनाधरणात जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले. तेव्हा पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील दोन विद्यार्थी पाण्यात बुडू लागले. तेव्हा इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी तिथे धाव घेतली आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आदित्य सचिन बुंदले (वय 20) याला वाचवण्यात यश आहे. पण मनिष शर्माचा बुडून मृत्यू झालाय. लोणावळा ग्रामीण पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. ( youth dies after drowning in pavana dam reservoir maval taluka )

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस आणि शिवदुर्ग मित्र मंडळ रेस्क्यू टीम तिथे दाखल झाले. शिवदूर्गच्या माध्यमातून सदर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले, अमोल गवारे, जय पवार, भिमराव वांळुज यांच्यासह स्थानिका आणि शिवदूर्गची टीम यांची यावेळी मदत झाली. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस तपास पवार साहेब करत आहेत.

अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष
– ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील ‘महिला अस्मिता भवन’चे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या, उद्या दुपारपर्यंत वाशीत थांबणार अन्यथा पुन्हा मुंबईकडे निघणार…आझाद मैदानावर गुलाल उधळणार’


dainik maval jahirat

Previous Post

‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal

Next Post

वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-shelke-vadgaon-maval

वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.