व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना

अन्नातून विषबाधा झाल्याने 149 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
goats-and-sheep-died

Photo Courtesy : Team Dainik Maval


अन्नातून विषबाधा झाल्याने 149 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे घडली. ह्या आपत्तीत गरीब मेंढपाळाचे सुमारे 20 लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पशुसंवर्धन विभागाने लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वेहेरगाव, वरसोली या ठिकाणी शेतात बसत आणि उदरनिर्वाह करत आहेत. रविवारी वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने रविवारी (दि. 28) मध्यरात्रीनंतर सोमवारी सकाळपर्यंत जवळपास 146 बकऱ्यांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत हा आकडा 149 पर्यंत गेला. ( unfortunate 149 goats and sheep died due to food poisoning incident at karandoli javaredoli in maval taluka )

शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळांनी तत्काळ गावातील नागरिकांना कळवले. नागरिकांनी मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वैद्यकीय पथकाने दोन दिवसांपासून बकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. परंतू अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पशूधन दगावल्याने गरिब धनगर बंधूवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

‘आम्ही रात्रंदिवस फिरून शेळ्या मेंढ्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करतो. आमच्या संसाराचा गाडा त्यांच्यावर चालतो. विषबाधा झाल्याने 149 शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी.’ – काळुराम बरकडे, मेंढपाळ

‘या कळपात एकून 403 शेळ्या आणि मेंढ्या होत्या. 28 जानेवारीला कुजून पडलेले शिळे अन्न शेळ्या, मेंढ्यांनी खाल्ले. त्यामुळे कळपातील काही मेंढ्याचे पोट फुगले, तोंडावाटे पाणी येऊ लागले. आम्ही तपासणी केल्यानंतर विषबाधेने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आमच्या टीमने रात्रंदिवस उपचार केले. त्यामुळे 100 ते 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचले. परंतू यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले असून त्याबाबत अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे.’ – पशुसंर्वधन विकास अधिकारी

अधिक वाचा –
– मावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या लोकल ट्रेनचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन । Pune Lonavala Local Train
– मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या ‘त्या’ 4 आंदोलकांचा कार्ला येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Maratha Reservation
– गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, ‘अशी’ होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Anil-Babar-Passed-Away

मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, 'अशी' होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.