व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 9, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “शिकेल समाज, जिंकेल समाज; गुणवंतांच्या पाठीवरती कौतुकाचा हात” या ब्रीदवाक्याला साजेसा दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा लोणारी समाज सेवा संघ, श्री क्षेत्र देहू यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत गाडगे महाराज धर्मशाळा, १४ टाळकरी कमानी शेजारी, श्री क्षेत्र देहू येथे आयोजित या कार्यक्रमास समाजबांधव, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पुजा अमोल दिवटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नाथा काळेल (उद्योजक, वाकड), लहू विश्वनाथ नरळे सीए (वडगाव धायरी, पुणे) तसेच रुपेश फोंडे (डायरेक्टर, वृंदा गुरुकुल फाउंडेशन अँड अकॅडमी) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोणारी समाजरत्न पितामह विष्णुपंत दादरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या एकूण १९गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच समाजातील समाजप्रिय व्यक्तिमत्त्व महेंद्र सोडमिसे (तळेगाव दाभाडे) यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटस्वरूप १९फाईल्स देऊन त्यांचे कौतुक केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअरच्या विविध संधी आणि जीवनातील यशाचे मंत्र याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रुपेश फोंडे यांनी “दहावी-बारावीनंतर काय?” या विषयावर सविस्तर करिअर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. अध्यक्षीय भाषणात पुजा दिवटे यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर ती पूर्ण करण्याचा संदेश दिला. काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त करून समाज संघटनेचे आभार मानले.

कार्यक्रमास पत्रकार विजय धंगेकर (जयसिंगपूर) तसेच प्राध्यापिका सुरेखा आवटे यांची विशेष उपस्थिती लाभली. संघाचे उपाध्यक्ष भगवंत आवटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संघाचे अध्यक्ष अमोल करांडे व संघाचे मार्गदर्शक प्रा.अजित गंगनमले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष गळवे, नवनाथ काळेल, एकनाथ राणे, गुलाब नरळे, दीपक खोत यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघाचे सचिव संदीप करचे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

गुणवंत विद्यार्थी
इयत्ता बारावी
श्रीधर रामदास सांगोलकर, आकांक्षा घनश्याम गवंड, क्रिश अतुल करांडे, प्रणव शांताराम करचे, ऋषिकेश दीपक खोत, वेदिका जानकीराम बोरचाटे, संस्कृत चिंतू शिंदे, वेदांत विठ्ठल आटपाडकर, प्रांजल अजित गंगनमले,
इयत्ता दहावी
प्रज्वल संदीप आटपाडकर, वैष्णवी दत्ता राणे, भक्ती संतोष होळकर, सान्वी दादासाहेब आटपाडकर, स्मिता उत्तम हिप्परकर, गणेश नारायण घेरडे,सोहम सुरेश करांडे, दिव्या नवनाथ गळवे, हर्षद अजित होळकर, श्रावण विजय धंगेकर

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Previous Post

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

Next Post

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.