व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 29, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात 9 कोटी 12 लाख मतदार, पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ, मावळ विधानसभेतही मतदारांची वाढ

निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊन मंगळवारी (दि. 23) मतदार यादी अंतिम करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊन मंगळवारी (दि. 23) मतदार यादी अंतिम (Final Voter List) करण्यात आली. ही यादी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांनी या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. आपल्या तपशीलात काही बदल करायचा असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. यादीच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राज्याची एकूण स्थिती काय?

ऑक्टोबर 2023 प्रारुप मतदार यादीत 24 लाख 33 हजार 766 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 20 लाख 21 हजार 350 मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 4 लाख 12 हजार 416 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 12 लाख 44 हजार 679 इतकी (9 Crore Voters In Maharashtra) झाली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 6 लाख 70 हजार 302 मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 8 लाख 33 हजार 496 मतदारांची वाढ झालेली आहे. ( Final Voter List In Maharashtra)

पुणे जिल्ह्याची स्थिती काय?

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि 23) जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभानिहाय एकूण मतदारांची संख्या देण्यात आली आहे. या यादीतील मतदारांच्या आकडेवारीवरून चिंचवड हा जिल्ह्यात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 21 पैकी 14 विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, उर्वरित सात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. (Chinchwad Is Largest Constituency In Pune)

मतदारांची संख्या वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड आणि शिरूर आदींचा तर, मतदार संख्या कमी झालेल्या मतदारसंघांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, कसबा, कँटोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. (Increase In Voters In Maval Constituency)

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी –

  1. जुन्नर – 3 लाख 8 हजार 439
  2. आंबेगाव – 2 लाख 98 हजार 598
  3. राजगुरुनगर (खेड) – 3 लाख 45 हजार 35
  4. शिरूर – 4 लाख 29 हजार 818
  5. दौंड – 2 लाख 99 हजार 260
  6. इंदापूर – 3 लाख 18 हजार 924
  7. बारामती – 3 लाख 64 हजार 40
  8. पुरंदर – 4 लाख 14 हजार 690
  9. भोर – 3 लाख 97 हजार 845
  10. मावळ – 3 लाख 67 हजार 779
  11. चिंचवड – 5 लाख 95 हजार 408
  12. पिंपरी – 3 लाख 64 हजार 806
  13. भोसरी – 5 लाख 35 हजार 666
  14. वडगाव शेरी – 4 लाख 52 हजार 628
  15. शिवाजीनगर – 2 लाख 72 हजार 798
  16. कोथरूड – 4 लाख 1 हजार 419
  17. खडकवासला – 5 लाख 21 हजार 209
  18. पर्वती – 3 लाख 34 हजार 136
  19. हडपसर – 5 लाख 62 हजार 186
  20. पुणे कॅंटोन्मेंट – 2 लाख 69 हजार 588
  21. कसबा पेठ – 2 लाख 72 हजार 747

अधिक वाचा –
– विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News
– मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke
– कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil


Previous Post

मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval

Next Post

मुंबई-पुणे प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, नाहीतर अडकाल… । Mumbai Pune Expressway News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
block-on-mumbai-pune-express-way

मुंबई-पुणे प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, नाहीतर अडकाल... । Mumbai Pune Expressway News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

June 28, 2025
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 28, 2025
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

June 28, 2025
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

June 28, 2025
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

June 28, 2025
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

June 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.