व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ नरेंद्र मोदी यांनी केला संकल्प

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 1, 2023
in पुणे, देश-विदेश, महाराष्ट्र, व्हिडिओ, शहर
narendra-modi-in-pune

Photo : Team Dainik Maval


‘देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना…’ असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले. ( PM Narendra Modi Pune Visit Take Darshan of Dagdusheth Ganapati )

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती.

मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या समवेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन | पुणे https://t.co/Dh6tYHEAKO

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2023

मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली. ( PM Narendra Modi Pune Visit Take Darshan of Dagdusheth Ganapati )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –

– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोक्का पॅटर्न! डोंगरे, परदेशी, मोतीरावे टोळ्यांवर मोक्का, एकूण 24 टोळ्यातील 226 गुन्हेगारांवर कारवाई
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार..! 1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत अनेक बदल, लगेच पाहा


dainik maval jahirat

Previous Post

मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’

Next Post

‘समृद्धी’चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Samriddhi-Highway-Shahapur-Accident

'समृद्धी'चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.