व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”

देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे 75 हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’ अशीही टीका करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
PM-Narendra-Modi

Photo Courtesy : Screen Gram / Twitter / Narendra Modi


केंद्रातील मोदी सरकार 75 हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मेगा इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्ट यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून ही भरती थांबवली. आता हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच होत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आता नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहे, अशी टीका लोंढेंनी केली. ( BJP Prime Minister Narendra Modi Job fair Congress Atul Londhe Criticism )

2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी 72 हजार जागा भरण्यासाठी मेघा भरतीचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात 72 जागा ही भरल्या नाहीत.
विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून भरती थांबवली.

— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) October 22, 2022

श्रम पोर्टलवर 22 कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त 7 लाख लोकांना नोकरी भेटली आहे. CMIE प्रमाणे 45 कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे
मोदी जी फडणवीस जी उत्तर द्या

— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) October 22, 2022

तसेच, श्रम पोर्टलवर 22 कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील फक्त 7 लाख लोकांना नोकरी मिळाली आहे. CMIE च्या मते 45 कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे. तर केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या 25 लाख जागा रिक्त आहेत. उपलब्ध नोकऱ्या, नोकरी मागणाऱ्यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता 75 हजार नोकऱ्या म्हणजे ‘उंट के मुंह में जिरा’ असेच म्हणावे लागले, असा घणाघात लोंढेंनी केला.

Addressing the Rozgar Mela where appointment letters are being handed over to the newly inducted appointees. https://t.co/LFD3jHYNIn

— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2022

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना 72 हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते 72 लोकांनाही नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फडणवीसांनी नोकर भरती केली नाही तर वेगळीच भरती केली. दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदारांची भाजपामध्ये भरती केली. मोदी आणि फडणवीस म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ असे लोंढे म्हणाले.

अधिक वाचा –

– एक दिवाळी अशीही, कौतुकास्पद उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श, पाहा व्हिडिओ
– भडकाऊ भाषण करणाऱ्या आमदार भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करा, लोणावळा भाजपा अल्पसंख्यांक सेलची मागणी
– मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

देहूगाव येथे कमी दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Next Post

“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chandrashekhar-Bawankule

"राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.